मेघ मल्हार सुरमैफिलीला प्रतिसाद
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा आणि माय बिट्स स्टुडिओ सातारा यांचे वतीने आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला मराठी हिंदी गीतांची शब्द सुरांची मैफल मेघ मल्हार आयोजित करण्यात आली.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांच्या सहकार्याने आणि माय बिट्स स्टुडिओ चे डॉ लियाकत शेख यांच्या संकल्पनेतून खास वर्षा ऋतू पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
प्रास्ताविकात शिरीष चिटणीस यांनी पाऊस कसा प्रत्येकांसाठी वेगळा भासतो यावर एक सुंदर कविता सादर केली.
प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा अर्बन पत संस्थेचे पदाधिकारी मनोहर देशमुख , सुनिल साबळे,डॉ लियाकत शेख आणि ब्युटी , वेलनेस, फिटनेस तज्ञ डॉक्टर मृणालिनी कोळेकर उपस्थित होते. प्रारंभी सर्वांचे स्वागत शिरीष चिटणीस यांनी केले. यावेळी कळसुबाई शिखर महिला ग्रूपसोबत सर केलेबद्दल डॉ मृणालिनी कोळेकर यांचा सत्कार माय बिट्स स्टुडिओच्या वतीने करण्यात आला .
कार्यक्रमाची सुरुवात भेट तुझी माझी स्मरते, नभ उतरू आले, केतकीच्या बनी या गीतांनी अनुक्रमे डॉ शेख, मंजिरी दिक्षित आणि वनिता कुंभार यांनी केली आणि सभागृहात टाळ्यांची बरसात झाली. उत्तरोत्तर पाऊस गीते आणि कवितांनी मैफल रंगत गेली. माय बिट्स चे गायक अल्ताफ शेख ,जलील शेख, डॉक्टर वाय. पी चव्हाण, मनोज सावंत यांसह चित्रा भिसे, इंद्रायणी कुलकर्णी, कल्याणी इनामदार, मंजिरी दिक्षित, वनिता कुंभार आणि डॉ लियाकत शेख यांनी मेघ मल्हार कार्यक्रमात सूर भरले. चित्रा भिसे यांनी आपल्या माहितीपूर्ण निवेदनाने कार्यक्रम रंगतदार केला. सचिन व अक्षदा शेवडे यांनी उत्तम ध्वनीव्यवस्था केली.लगान चित्रपटातील घन न घन गीताने सांगता झाली. कार्यक्रमास डॉ सुहास पाटील, मुकुंद पांडे,रवींद्र खांडेकर आणि शहरातील अनेक रसिक उपस्थित होते. आभार डॉ लियाकत शेख यांनी मानले.

