विजय साबळे यांची कौतुकास्पद गायन सेवा
गायक मुकेश यांच्या तब्बल 24 गाण्यांचे पाठोपाठ गायन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व विजय साबळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कलाकार अनेक गायक एक स्वर्गीय र्गीय मुकेशचंद्र माथुर या संगीताच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे संयोजक विजय साबळे यांनी यांनी मुकेश यांची तब्बल 24 गाणी एका पाठोपाठ एक सादर करून कॊतुकास्पद कामगिरी केली
दीपलक्ष्मी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये एकूण २७ गाणी सादर करण्यात आली त्यापैकी तब्बल 24 गाणी विजय साबळे यांनी कधी एकट्याने तर कधी युगलगीत पद्धतीने सादर केली शिवाय मिलिंद हर्षे यांनी सुद्धा मुकेश यांची तीन गाणी सादर करून वाहवा मिळवली यावेळी वैशाली चंद्रसाली,रेवती बंड श्वेता जाधव या गायिकांनी विजय साबळे यांना साथ देऊन कार्यक्रमाची उंची वाढवली
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्याम बडवे गणेश शिंदे काका पाटील विजय साबळे शिरीष चिटणीस मुकुंद फडके उपस्थित होते व्यवसायाने साऊंड रेकॉर्डिंग असलेल्या गणेश शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून मुकेश यांच्या या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे वेगळा आनंद मिळाल्याचे सांगितले मुकुंद फडके यांनी गायक मुकेश यांच्या काही आठवणींना उजाळा दिला काका पाटील यांनी विजय साबळे यांचे कौतुक केले आणि आगामी कालावधीमध्ये सुद्धा असेच कार्यक्रम अपेक्षित असल्याचे सांगितले
कार्यक्रमाचे निवेदन दिपाली घाटगे यांनी केले ध्वनीयंत्रणा सचिन शेवडे यांनी सांभाळली
यावेळी विजय साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चांद आहे भरेगा, तारो मे सजके, मै ढूढता हू जिनको, चंदन सा बदन, ईफतदा इश्क मे हंम,
ले चल मेरे जीवनसाथी, जो तुमको है पसंद वो बात करेंगे, दिल की नजरसे, आसू भरी है ये जीवन की राहे, दिवानो से ये मत पुछो ,
वक्त करता जो वफा ,भुली हुई यादो ,मेरा प्यार भी तु है, कई सदियोंसे कई जनमोसे, तुमने कभी किसींसे प्यार किया है, बहारोने मेरा चमन लुटकर, आ अब लोट चले, राम करे ऐसा हो जाये, ये मेरा दिवानापन है ,किसी राहो मे, मै पल दो पल का शायर हु, दर्पण को देखा, मै तो एक ख्वाब हु, वो तेरे प्यार का गम ,मैने तेरे लिये सात रंग, जिंदगी ख्वाब है, चलरी सजनी अब क्या सोचो हि अप्रतिम गाणी सादर केली
फोटो ओळ
दीप प्रज्वलन करताना गणेश शिंदे,डॉ शाम बडवे ,रेवती बंड ,मुकुंद फडके,शिरीष चिटणीस,काका पाटील,विजय साबळे,मिलिंद हर्षे

