राज कपूर यांना जन्मशताब्दीनिमित्त गीतांजली
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि सुहाना सफर ग्रुपचा उपक्रम
सातारा
हिंदी चित्रपट सृष्टीतील ग्रेटेस्ट शोमन राजकपूर यांची जन्मशताब्दी 14 डिसेंबर पासून सुरू झाली आहे त्यानिमित्ताने दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा आणि सुहाना सफर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बहुरंगी राज कपूर हा मधुर गीतांचा कार्यक्रम सादर करून राज कपूर यांना गीतांची आदरांजली वाहण्यात आली दीपलक्ष्मी पतसंस्थेमध्ये सभागृहामध्ये झालेल्या या मैफिलीचे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल वाळिंबे ,ऍड सीमंतनी नुलकर, शिरीष चिटणीस आणि मुकुंद फडके उपस्थित होते
या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन विजय साबळे यांचे होते यावेळी गायक कलाकार सचिन शेरकर डॉक्टर लियाकत शेख वनिता कुंभार मंजिरी दीक्षित आणि विजय साबळे यांनी राज कपूरच्या दीर्घ चित्रपट कारकीर्दीतील अनेक चित्रपटातील गाणी सादर करून रसिकांना तृप्त केले राज कपूर मुकेश शैलेंद्र आणि शंकर जय किशन हे गाजलेले समीकरण सिद्ध करणारी अनेक गाणी गायक कलाकारांनी सादर केली मेरा नाम जोकर चित्रपटातील जिना यहा मरना यहा या गाण्याने मैफिलीची सांगता झाली
यावेळी बोलताना ऍड सीमांतरी नुलकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि इतक्या वर्षानंतरही राज कपूर यांची गीते मनाला प्रसन्न करतात असे त्यांनी स्पष्ट केले
मुकुंद फडके यांनी आपल्या भाषणामध्ये राज कपूरच्या कारकिर्दीचा गौरव करताना कोल्हापूरमध्ये असलेल्या राज कपूर यांच्या पुतळ्याचा उल्लेख केला राज कपूर यांना संगीताचा चांगला कान असल्यामुळेच त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये संगीत लोकप्रिय झाले असे त्यांनी सांगितले
शिरीष चिटणीस यांनी आपल्या भाषणामध्ये या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे अशा सांस्कृतिक उपक्रमांना नेहमीच पाठिंबा दिला जाईल असे त्यांनी सांगितले
यावेळी दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या पुढाकाराने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला
या संगीत मैफिलीचे निवेदन दिपाली गीते यांनी केले तर ध्वनी संयोजन सचिन शेवडे यांचे होते
या कार्यक्रमाला सातारकर रसिकांचा तुफान प्रतिसाद लाभला