आठ डिसेंबरला साताऱ्यात वधु वर मेळावा
अखिल ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
सातारा
ब्राह्मण समाजासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणाऱ्या अखिल ब्राह्मण महासंघातर्फे रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी समाजातील सर्व पोट शाखेतील वधू-वरांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे राजवाडा येथील महिला मंडळ महिला हॉलमध्ये सकाळी दहा ते दुपारी तीन या कालावधीमध्ये हा मेळावा होणार आहे मेळाव्यासाठी शासनमान्य ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था परांडा यांचेही सहकार्य लाभले आहे
हा वधुवर मेळावा ब्राह्मण समाजातील सर्व पोट शाखेतील 22 ते 60 वर्षापर्यंतच्या प्रथम,घटस्फोटीत, जेष्ठ, व्यंगधारक वधू-वरांसाठी खुला असून मेळाव्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातूनही स्थळे पाठवण्यात येणार आहेत
या मेळाव्याचा लाभ वधूवरांनी घ्यावा आणि अधिक माहितीसाठी अखिल ब्राह्मण महासंघाच्या सोमवार पेठ येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे