शनिवारी लेखक तुमच्या भेटीला


विद्या पोळ-जगताप यांच्या “बाय गं”या पुस्तकाविषयी संवाद

सातारा
आम्ही पुस्तक प्रेमी समूह’ आणि दीपलक्ष्मी नागरिक सहकारी पतसंस्था मर्या,. सातारा आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात विद्या पोळ-जगताप
यांच्या “बाय गं” या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाविषयी तसेच त्यांच्या या पूर्वीच्या ‘जगणं कळतं तेव्हा’ कादंबरी व ‘देवचाफा’ या काव्यसंग्रहाविषयी गप्पा व संवाद कार्यक्रम दीपलक्ष्मी हॉल येथे शनिवार दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमास डॉ.संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, श्रीराम नानल, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमाचे संवादक वैदही कुलकर्णी या आहेत.उपक्रम समन्वयक स्वाती राऊत आहेत.
विद्या पोळ-जगताप यांनी सोलापूर मनपा उपायुक्त,पाचगणी वाई मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे.मुख्याधिकारी असताना शहराचे नावलौकीक राष्ट्रीय पातळीपर्यंत नेणा-या अधिकारी आणि लेखिका म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. 2018 साली ” जगणं कळतं तेव्हा” ही पहिली कादंबरी राजहंस प्रकाशन कडून प्रकाशित झाली.या ग्रंथाला “मिलिंद संगोराम स्मृती ” पुरस्कार मिळाला”.तसेच त्यांचे शैक्षणिक व अंधश्रद्धा निर्मूलन विषयक ‘लेखन ‘ आणि अनेक ललित लेख प्रसिद्ध झाले आहे.2022 साली “देव चाफा” काव्यसंग्रह आणि 2023 साली “बाय गं” सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली.

Advertisement

या कार्यक्रमास सर्व साहित्य प्रेमींनी यावे असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख संदीप श्रोत्री व दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!