मंगळवारी महिला प्रबोधन मेळावा
स्वावलंबी भारत अभियान, सातारातर्फे आयोजन
सातारा
स्वावलंबी भारत अभियान, सातारातर्फे मंगळवार दिनांक 12 मंगळवारी नोव्हेंबर रोजी महिला प्रबोधन मेळावा आयोजित केला आहे.नटराज मंदिर सातारा येथे दुपारी दोन वाजता हा मेळावा होणार असून तो पूर्णपणे विनामूल्य आहे
महिलाना स्वयंस्फूर्तीने काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करून कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावायचा असतो. पण कोणता व्यवसाय करणं योग्य ठरेल,त्याला भांडवल कसं उभं करायचं,त्याला बाजारपेठ कशी शोधायची,बचत गट कसा सुरु करायाचा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा या संस्थेच्या संचालिका श्रीमती कांचनताई परुळेकर यांना या मेळाव्यात आमंत्रित केलं आहे.
यावेळी कुटुंब एकत्र ठेवणं, मुलांवर चांगले संस्कार करणं याविषयी सौ. स्वाती गानू मार्गदर्शन करणार आहेत. महिला आपल्या मनात असलेले प्रश्न त्यांना विचारू शकतील
सर्व महिलांनी मोठ्या संख्येने आणि शिस्त पाळून मेळाव्याला वेळेत हजर राहावे असे आवाहन स्वावलंबी भारत अभियानाच्या प. महाराष्ट्र महिला सहसमन्वयक सायली मुतालिक यांनी केले आहे

