राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी


निवडणूक अधिकाऱ्यांनी केली तपासणी
थिरुवनंतपूरम
काँग्रेस नेते राहुल गांधी हे तामिळनाडु दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ते गेले असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.पोलिसांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर उतरल्यानंतर तपासणी केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात निघाले होते. प्रचारसभेला पोहचण्यासाठी ते हेलिकॉप्टरने निलगिरीत दाखल झाले होते.
निवडणूक आयोगाने ७५ वर्षांच्या इतिहासात यावेळी सर्वाधिक रोकड जप्त केली आहे. तपासातून कोणत्याही मोठ्या नेत्याला सूट दिली जात नाहीय. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडुत निलगिरीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. त्यावेळी निवडणुक आयोगाच्या फ्लाइंड स्क्वाडचे अधिकारी हेलीपॅडवर पोहोचले. त्यांनी राहुल गांधी ज्या हेलिकॉप्टरमधून आले त्याची तपासणी केली.
राहुल गांधी सलग दुसऱ्यांदा वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याठिकाणी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!