सर्व्हे सांगतो महाराष्ट्रात महायुतीच येणार


महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळण्याची शक्यता
मुंबई
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी उमेदवारांचं आणि पर्यायी राज्याचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.तत्पूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत नेमकं बाजी कोण मारणार, याविषयीचा पहिला अंदाज आणि त्यासंदर्भातील पहिली आकडेवारी नुकतीच समोर आली आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीआधी करण्यात आलेल्या मॅटराईज सर्वेक्षणानुसार राज्यात भाजप नेतृत्त्वाअंतर्गत येणाऱ्या महायुतीच्या वाट्याला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. आएएनएस मॅटराईजच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभा निवडणुकीत 145 ते 165 जागांवर विजय मिळू शकतो. तर, मविआला 106 ते 126 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
महायुतीला 47 टक्के मते मिळण्याचा अंदाज असून, मविआच्या वाट्याला 41 टक्के मतं जाण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणातील आकडेवारी पाहता भाजपला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि ठाण्यासह कोकणातही मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदासाठीचा लोकप्रिय उमेदवार म्हणून गृहित धरलं जात आहे. साधारम 40 टक्के मतदारांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून समर्थन दिलं असून, उद्धव ठाकरे यांना 21 टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना 19 टक्के मतदारांनी या पदासाठी पसंती दर्शवली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!