भारतात आले सर्वात मोठे जहाज


चार फुटबॉल मैदानाएवढी आहे जागा

Advertisement

मुंबई
देशाच्या सागरी आणि बंदर उद्योगासाठी २६ मे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. लॉजिस्टिक कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने भारतातील सर्वात प्रमुख बंदर मुंद्रा बंदरावर रविवारी सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाचे स्वागत करून आणखी एक विक्रम केला.
हे जहाज मेडिटेरेनियन शिपिंग कंपनीचे आहे, हे जहाज २६ मे रोजी मुंद्रा बंदरावर आले, जे बंदर आणि देशाच्या सागरी उद्योग या दोन्हीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या जहाजाची एकूण लांबी अंदाजे ३९९.९८ मीटर आहे, हे चार फुटबॉल मैदानांच्या बरोबरीचे आहे. भारतीय बंदराच्या इतिहासातील सर्वात मोठे मोठे कंटेनर जहाज आहे.त्याचा अराइव्हल ड्राफ्ट १६.३ मीटर आहे, जो फक्त अदानी पोर्ट्स, मुंद्रा येथे आणला जाऊ शकतो. भारतातील इतर कोणतेही बंदर डीप-ड्राफ्ट जहाजांना थांबवून ठेवण्यास सक्षम नाही.
अदानी पोर्ट्स, मुंद्रा हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित केले आहे. या बंदरावर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे बंदर ३५,००० एकरांवर पसरले आहे. सध्या हे भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक बंदर बनले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!