सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांच्या लाईव्ह मैफलीला प्रतिसाद
सातारा
दीपावलीच्या पूर्वसंध्येला राजेंद्र रानडे, सौ उज्वला करंबेळकर यांनी प्रस्तुत केलेली आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी आयोजित केलेली सुमन कल्याणपूर यांच्या मराठी हिंदी गाण्यांची, लाईव्ह सुरेल मैफल दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये सादर करण्यात आली
कार्यक्रमाची सुरवात देवगृही या भक्तजनांना गौरीनंदन पावल’ या गीताने सौ.उज्वल करंबेळकर यांनी केली. यानंतर चल उठरे मुकुंदा, केतकीच्या बनी तिथे नाचला मोर, जिथे सागरा धरणी मिळते, अरे संसार संसार, मृदुल करांनी छोडन तारा, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, असावे घर ते अपुले छान, घाल घाल पिंगा अशी गाणी उज्वलताई आणि श्रेयाताईंनी सादर केली.त्यांना उत्कृष्ठ साथ रानडे आणि नाडकर्णी यांनी दिली. सुमन कल्याणपूर यांच्या असंख्य गाण्यांमधून गाणी कोणती निवडायची असाच जणू प्रश्न होता. त्यांच्या हिंदी Duet गाण्यांमध्ये सुध्दा दिलने फिर याद किया हे शिरीष चिटणीस आणि उज्वला करंबळेकर यांनी सादर केले. डॉ.बारटक्केबरोबर तुझे प्यार करते है करते रहेंगे, मेरा प्यार भी तू हैं, ये मौसम रंगीन समाँ सारखी आणि आजकल तेरे मेरे प्यार के चर्चा हर जुबानपर, गाण्यांची झलक सादर करून शेवटी कम सप्टेंबर या म्युझिकवर त्यांनी गायलेल्या ‘रिमझिम रिमझिम को बरसे मोती के दाने, बिखरे खजाने सारख्या दुर्मिळ गाण्याने राजेंद्र रानडे यांनी संपूर्ण धून वाजवून कार्यक्रमाची सांगता केली. अतिशय आल्हाददायी वातावरणात कार्यक्रम छान सादर केल्याने बऱ्याच श्रोत्यांनी येऊन सर्वांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन शिरीष चिटणीस म्हणाले, भविष्यात या कलाकारांनी ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेच्या पाचही शाळांमध्ये संगीतकार राजेद्र रानडे, सौ उज्वल करंबेळकर आणि इतरांनी विद्यार्थ्यांसाठी संवाद किंवा प्रत्यक्ष संगिताचे शिक्षण द्यावे,ज्यामुळे त्या मुलांच्या जीवनात आनंद येईल.
डॉ सारिका देशपांडे यांनी सुमन कल्याणपूर यांच्याविषयी त्यांचा सुरेल आवाज आणि त्यांचा अतिशय साधेपणाचा उल्लेख केला. इतरही माहिती त्यांनी श्रोत्यांना करून दिली.
संगीत समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट माहिती सांगत सूत्रसंचालन केले

