मतदान करणे हे नागरिकांचे पवित्र कर्तव्य
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे प्रतिपादन
कोरेगाव
मतदान करणे हा आपला हक्क आहे अधिकार आहे तसेच ते सर्व नागरिकांचे पवित्र कर्तव्य आहे 20 नोव्हेंबर रोजी सर्वांनी अवश्य मतदान करावे आणि इतरांनाही त्याची आठवण करून द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
कोरेगाव येथे मतदान जनजागृतीवर आधारित लहान मुलांनी पथनाट्य सादर केले .हा कार्यक्रम जुना स्टॅन्ड येथे उत्साहात झाला. तसेच जनजागृती रथाचे उद्घाटन श्रीमती नागराजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी धनंजय चोपडे ,पथक प्रमुख यशेन्द्र क्षीरसागर शिक्षण विस्तार अधिकारी वनीता मोरे,तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
येथील सुभाषनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे मतदान जागृती करणारे पथनाट्य जुना स्टॅन्ड येथील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत सादर केले. सर्व नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रीमती नागराज यांनी देखील या मुलांचे भरभरून कौतुक केले. या पथनाट्यातून खूप महत्त्वाचा मतदानाचा संदेश मुलांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे असे त्या म्हणाल्या. सर्व नागरिकांनी स्वतः मतदान करावे इतरांना प्रोत्साहन द्यावे असे देखील त्या म्हणाल्या. यावेळी सर्व मतदारसंघातून मतदान जनजागृतीसाठी फिरावयाच्या चित्ररथाचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते झाले .या चित्ररथाच्या सर्व बाजूंनी मतदानाचे संदेश करणारे आकर्षक बोर्ड लावले आहेत .तसेच सर्व गावातून मतदान करण्याचे आवाहन या चित्ररथामार्फत करण्यात येणार आहे .प्रभावीपणे मतदान जागृती होत असून सर्व नागरिकांनी 20 नोव्हेंबरला जागरूकपणे न चुकता न विसरता मतदान करावे असे आवाहन गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी केले. केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी यांनी आभार मानले

