आज ‘मधुर गीतों का सफर’ कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित गीत मैफिल
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजितसुरमई शाम “दिल का साज” प्रस्तुत ‘मधुर गीतों का सफर’ हा गीत मैफिलीचा कार्यक्रम दीपलक्ष्मी संस्कृतिक हॉल येथे सोमवार दि. 21 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या गीत मैफिलीचे दीपप्रज्वलन डॉ. लियाकत शेख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून काका पाटील,डॉ.शाम बडवे, अनिल वाळिंबे, रमेश वेलणकर, शिरीष चिटणीस इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये सलीम सय्यद, शबाना शिकलगार, सलीम शिकलगार, शरीफ शिकलगार, मोईन शिकलगार आणि इतर गायक कलाकार सहभाग घेणार असून आपली सुमधुर गीते सातारकर रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार आहेत.हा कार्यक्रम संस्थेतर्फे आयोजित केला असून प्रवेश विनामूल्य आहे या गीत मैफल कार्यक्रमास सर्व सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!