वन-फुल कार्यक्रमामध्ये अनोख्या गीतांचे सादरीकरण


सातारा
हिंदी चित्रपटसृष्टीला संगीत क्षेत्रामध्ये गायक, संगीतकार, गीतकार अशा सर्वांचेच योगदान लाभले. प्रत्येकाचीच आठवण इतक्या वर्षानंतरही चाहत्यांना येते. अशा कलाकारांची आठवण म्हणून हिंदी चित्रपटातील गाजलेल्या गीतांचा वन फुल हा कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती व निवेदन ममता नरहरी यांचे होते .त्यांनी स्वतः व विजय साबळे या दोघांनी या कार्यक्रमामध्ये विविध गाणी सादर करून त्या गाण्यांमध्ये पार्श्वभूमी सुद्धा विशद केली. प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता कोरपे, गजानन दीक्षित,शिरीष चिटणीस, मुकुंद फडके, विनय कुलकर्णी, जगदीश खंडागळे, जनार्दन निपाणे आणि सचिन शेवडे उपस्थित होते.
ममता नरहरी यांनी अस्खलित हिंदीमध्ये या कार्यक्रमाचे निवेदन करून गाण्यांमागील पार्श्वभूमी सांगितली. गुलजारसारख्या ज्येष्ठ कवींची मानसिकताही त्यांनी उत्कृष्टपणे उलगडून दाखवली. गीतकार संगीतकार आणि गायक यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच उत्कृष्ट गाणे निर्माण होते असे त्यांनी स्पष्ट केल.

Advertisement

यावेळी शिरीष चिटणीस यांनी सांगीतले कि,पूर्वीच्या चित्रपटातील गाणी समाजाचे प्रबोधन करीत देशामधील प्रश्न मांडीत असत आणि त्याचबरोबर मनोरंजनही करीत असत. साताऱ्यातील गाणी म्हणणाऱ्या गायकांना दीपलक्ष्मी पतसंस्थेने त्यांचेकडे असणाऱ्या कल्पना आणि त्यासाठी कार्यक्रम करण्यासाठीही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ममता नरहरी यांचा हा तिसरा स्वतंत्र कार्यक्रम होत आहे. ममता नरहरी यांचे असलेले हिंदी भाषेवरील प्रभुत्व तसेच शेर सांगून रसिकांची कार्यक्रमांची रंगत वाढविण्याची कला वाखाणण्यासारखी आहे.त्यांचे गझलवर असणारे प्रभुत्व कार्यक्रम ऐकताना जाणवते.त्यांनी असेच कार्यक्रम करीत सातारकरांना मनोरंजनाची मेजवानी द्यावी.गजानन दीक्षित, मुकुंद फडके, स्मिता कोरपे यांनीही मनोगत व्यक्त केले आणि या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाबद्दल ममता नरहरी व विजय साबळे यांचे अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!