‘संस्कृती’ दिवाळी अंकाचे साताऱ्यात गुरुवारी प्रकाशन
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजन
सातारा
प्रसिद्ध लेखिका प्रकाशिका आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या कार्यवाह सौ सुनीता राजे पवार संपादित दर्जेदार दिवाळी अंक ‘ संस्कृती ‘ याचे प्रकाशन दीप लक्ष्मी हॉल सातारा येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.हा दिवाळी अंक ‘मराठी भाषा ‘ या विषयावर आधारित असणारा आहे .
या दिवाळी अंकाचे प्रकाशन साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे कोषाध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने ,ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे,संगीततज्ञ श्री अनिल वाळींबे ,पर्यावरण रक्षक व लेखिका संध्या चौगुले ,प्रसिद्ध लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री आणि कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे श्री शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत .
या दिवाळी अंकात डॉक्टर संजय सोनवणी ,केशव देशमुख ,डॉक्टर राजेंद्र माने , प्रा मिलिंद जोशी , विनोद कुलकर्णी ,शिरीष चिटणीस , सुजाता शेणई , डॉक्टर महेंद्र कदम ,मंगेश काळे वगैरे मान्यवरांचे लेख आहेत. त्याचबरोबर कथा स्पर्धेतील विजेत्या विविध कथाही आहेत .
हा कार्यक्रम गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दीपलक्ष्मी हॉल सातारा येथे संपन्न होणार आहे तरी सर्व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.

