टरफल पुस्तकावर बुधवारी चर्चासत्र
दीपलक्ष्मी पतसंस्था व नाट्य परिषद सातारा शाखा यांचा उपक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सातारा शाखा यांच्यातर्फे रंगकर्मी पत्रकार राजू मुळे यांनी लिहिलेल्या टरफल या तीन एकांकीकांच्या संग्रहावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे हे चर्चासत्र होणार आहे
यावेळी या चर्चासत्रामध्ये विनोद कुलकर्णी,सीमांतिनी नूलकर, श्रीकांत कात्रे,मुकुंद फडके,डॉक्टर राजेंद्र माने,शिल्पा चिटणीस,विजय लाटकर डॉक्टर निलेश माने हे मान्यवर सहभागी होणार आहेत
या चर्चासत्राचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आणि उपाध्यक्ष अशोक काळे यांनी केले आहे सध्या दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये पुस्तक प्रदर्शन सुरू असून ते 14 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे या पुस्तक प्रदर्शन उपक्रमाचा एक भाग म्हणूनच टरफल या पुस्तकावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे

