धोंडिबा शेलार यांचे निधन
सातारा
खावली (ता. वाई) येथील धोंडिबा पांडुरंग शेलार (वय ९४)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी दोन नातवंडे ,असा परिवार आहे.
धोंडिबा शेलार हे अत्यंत श्रद्धाळू होते. येथील ग्रामदैवत नवलाई व रामवरदायीनी देवींची गेली अनेक दशके आराधना केली. उत्तम शेतकरी आणि परिसरातील लोकांच्या घरे बांधकामात त्यांनी त्यांनी आयुष्य व्यतीत केले.
वाई पंचायत समितीचे माजी सभापती श्री. चंद्रकांत धोंडिबा शेलार यांचे ते वडील होत.

