श्रीरामांच्या माथ्यावर सूर्यकिरणं


रामनवमीला दिसेल अभूतपूर्व दृश्य
अयोध्या :
22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात श्रीरामांच्या अत्यंत आखीव-रेखीव सुंदर अशा मूर्तीची स्थापना करण्यात आली.प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर पहिल्यांदा साजरी होणारी रामनवमी खास असणार या काहीच शंका नाही.आता येत्या 17 एप्रिल रोजी आणखी एक अद्भुत असा क्षण पाहायला मिळणार आहे.
17 एप्रिलला सर्वत्र रामनवमी साजरी होईल. याच दिवशी दुपारी 12:00 वाजता अयोध्येच्या राम मंदिरातील श्रीरामांच्या माथ्यावर सूर्यकिरणं पडतील. उत्तराखंडमधील आयआयटी रुडकीच्या शास्त्रज्ञांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. आरश्याच्या माध्यमातून सूर्यकिरणं श्रीरामांच्या माथ्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाला असून आता तो रामनवमीला सर्वांना पाहता येईल.
रामनवमीच्या दिवशी राम मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील एका आरश्यावर सूर्याची किरणं पडतील. ती परावर्तित होऊन एका पितळेच्या पाईपमध्ये जातील. या पाईपमध्ये असलेल्या एका आरश्यावर किरणं परावर्तित होऊन 90 डिग्रीवर पुनर्परावर्तित होतील. त्यानंतर पितळेच्या पाईपमधून किरणं 3 वेगवेगळ्या लेंसमधून जातील. मग पाईपच्या टोकाला मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या एका आरश्यावर किरणं पडून थेट श्रीरामांच्या मुखावर दिसतील. त्यांच्या माथ्यावर 75 मिमी आकाराचा एक गोल तयार होईल. रामनवमीला दुपारी 12 वाजता श्रीरामांच्या माथ्यावर हा सूर्यकिरणांचा टिळा पाहता येईल. श्री राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी या प्रयोगाबाबत शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!