अभिनेता गोविंदाला लागली गोळी


उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल

मुंबई
बॉलिवूडचा सुपरहिरो गोविंदा स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागल्याने जखमी झाला आहे. ही घटना सकाळी 5 वाजता घडली
त्याच्याकडे असलेले परवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करताना चुकून त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याला काही कामानिमित्त बाहेर जायचे होते, बाहेर जाण्याची तयारी सुरू असतानाच हा अपघात घडला आहे. या घटनेत गोविंदा जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोविंदाची बंदूक ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या गोविंदाच्या पायातून खूप रक्त वाहत आहे. रक्त थांबत नसल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याच्यावर अंधेरीच्या कृती केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!