शुक्रवारी साताऱ्यात मुकेश के अंदाज विजय की आवाज
दीपलक्ष्मी सभागृहात दुपारी ४ वाजता होणार कार्यक्रम
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित व विजय साबळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी मुकेश के अंदाज विजय की आवाज हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. कलाकार अनेक गायक एक या संकल्पनेखाली भारतभूषण, दिलीप कुमार, राजकपूर ,शशी कपूर, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना अशा अनेक कलाकारांना मुकेश यांनी जो आवाज दिला होता अशी 40 गाणी या कार्यक्रमामध्ये सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि गायक विजय साबळे असून निवेदन मिलिंद हर्षे करणार आहेत. ध्वनीव्यवस्था सुभाष कुंभार सांभाळणार आहेत .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार निकम, रवींद्र खंदारे ,श्रीराम नानल, सुरेखा शेजवळ ,मुकुंद फडके, ऋषिकेश भिलारे, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
बारा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे

