साताऱ्यात मंगळवारी सरगम राज कपूर हिंदी गीतांचा कार्यक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि विजय साबळे यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी ५-३० वाजता दीपलक्ष्मी हॉल , सातारा येथे सरगम राजकपूर हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. साताऱ्यातील जेष्ठ संगीत अभ्यासक कै.अनिल वाळिंबे यांना या गीताद्वारे आदरांजली वाहण्यात येणार आहे . या कार्यक्रमामध्ये विजय साबळे, सचिन शेरकर, मंजुषा पोतनीस, सुषमा बगाडे, स्मिता शेरकर, रेवती बंड, ममता नरहरी, शिल्पा चिटणीस हे स्वरसाज चढवणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरिष चिटणीस, मुकुंद फडके,सुरेख शेजवळ,अशोक वाळिंबे, ऍड आशुतोष वाळिंबे, ऍड रेश्मा वाळिंबे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. स्नेहल कुलकर्णी करणार असून ,ध्वनी व्यवस्था ही सुभाष कुंभार यांची आहे. कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना विजय साबळे यांची आहे. सदर कार्यक्रम सर्व सातारकर रसिकांना विनामूल्य असून सर्वांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेला आहे.

