टीम इंडियाचे अनेक विक्रम
कसोटीच्या एका डावात विक्रमांना गवसणी
कानपूर
कानपूर क्रिकेट कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. भारताने 9 गडी गमवत 285 धावांवर डाव घोषित केला. यावेळी भारताकडे 52 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने अवघ्या 34.4 षटकांत या 285 धावा केल्या.यासह विक्रमांची रांग लावली .
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 3 षटकात 50 धावा करणारी पहिली टीम ठरली आहे. इतकंच काय तर कसोटीत 10.1 षटकात 100 धावांचा पल्ला गाठण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावाव होता. हा विक्रम होत नाही तोच कसोटीत 24.2 षटकात 200 धावा करणारा पहिला संघ म्हणून मान मिळवला.
यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक रूप दाखवलं होतं. या जोडीने कसोटीत 19 चेंडूत 50 धावांची सर्वात वेगवान भागीदारी केली आहे. यावेळी यशस्वी जयस्वालने 13 चेंडूत 30, तर रोहित शर्माने 6 चेंडूत 19 धावा केल्या. तर एक धाव नो बॉलच्या रुपाने मिळाली.
भारताने 34.4 षटकात 285 धावा केल्या. या धावा करताना प्रत्येक खेळाडूचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता. भारताने एका डावात 8.2 च्या रनरेटने धावा करण्याचा विक्रमही रचला आहे.
कसोटीत पहिल्यांदा एका ओपनरने अर्थात रोहित शर्माने पहिल्या दोन चेंडूवर षटकार मारले आहेत. पहिल्या षटकासाठी स्ट्राईकला जयस्वाल होता. त्याने सहा चेंडूंचा सामना करत 12 धावा केल्या. दुसऱ्या षटकात रोहित शर्माला स्ट्राईक मिळाली. खलिल अहमदच्या पहिल्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकले.
भारताने एका वर्षात सर्वाधिक 96 षटकार मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. .यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. बेझबॉल रणनितीसह इंग्लंडने 2022 मध्ये 89 षटकार मारले होते. भारताला या वर्षात आणखी कसोटी खेळायच्या आहेत. त्यामुळे हा आकडा 100 च्या पार जाणार हे नक्की आहे