ऊसतोडणी मुकादमाकडून वाहतूकदाराची फसवणूक


ऍडव्हान्स रक्कम घेऊन केले पलायन

Advertisement

सातारा
सातारा जिल्ह्यामध्ये ऊस तोडणी कामगार पुरवठा करण्याच्या निमित्ताने ऊस वाहतुकदारांची फसवणूक होण्याचे प्रकार समोर येत आहेत ऊस तोडणी मुकादमाने वाहतूक ठेकेदाराकडून ऍडव्हान्स रक्कम घेऊन नंतर करार पूर्ण न करता पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबतची तक्रार संबंधित वाहतूक ठेकेदाराने सातारा तालुका पोलीस स्टेशनला दाखल केली आहे या प्रकरणामीमध्ये तक्रारदार वाहतूक ठेकेदाराचे नाव रणजितसिंग मोरे पाटील असून त्यांचा ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारीचा व्यवसाय आहे गेल्या तीन वर्षांपासून ते हा व्यवसाय करत आहेत या दरम्यान त्यांची ओळख मध्य प्रदेशातील ऊसतोडणी मुकादम राजू जमारिया यांच्याशी झाली नंतर रणजीत मोरे पाटील आणि त्यांचे मित्र प्रमोद घोरपडे यांनी मध्यप्रदेश येथे जाऊन राजू जमारिया यांची भेट घेतली आणि त्यांनी ऊस तोडणीसाठी टोळीची व्यवस्था करतो असे सांगून काही मजुरांची भेटही घालून दिली नंतर मोरे पाटील यांनी काही स्वरूपात रोख रक्कम त्याला दिली त्यानंतर जून महिन्यामध्ये त्याच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावर 50 हजार रुपयेही ऍडव्हान्स म्हणून ट्रान्सफर केले ही रक्कम त्याला मिळाल्याचे त्याने कबूलही केले त्यानंतर जून महिन्यामध्ये संबंधित व्यवहाराची नोटरी प्रक्रिया करण्यासाठी त्याला सातारा येथे बोलवण्यात आले ऍडवोकेट जनार्दन बंडू यादव यांच्या कार्यालयात दोघे गेले ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोरे पाटील यांनी अजिंक्यतारा कारखाना शेंद्रे येथे जाऊन तेथील उप कृषीअधिकारी श शिंदे यांनाही मुकादम जमारिया याची गाठ घालून दिली त्यांनी त्याला काही प्रश्न विचारले असता तो सतर्क झाला आणि काही वेळातच तेथून काही कारणाने गायब झाला परिसरात शोध घेऊनही तो कोठेही सापडला नाही त्यानंतर मोरे पाटील दीर्घ काळ त्याच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते पण त्याचा फोन बंद होता आणि संपर्क होत नव्हता त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे मोरे पाटील यांच्या लक्षात आले आणि त्यांनी या संदर्भात सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे
सातारा जिल्ह्यात असे अनेक फसवणुकीचे प्रकार घडत असून अशा बनावट मुकादमांवर कारवाई झाली तर फसवणुकीचे प्रकार थांबतील अशी अपेक्षा मोरे पाटील यांनी व्यक्त केली आहे
वाई तालुक्यातही नुकतीच अशा प्रकारची फसवणूक झाली असून वाई पोलिसांनी त्याबाबत एका मुकादमाला अटक केली आहे त्या व्यक्तीने सुद्धा ऊस तोडणी कामगार पुरवतो म्हणून ऊस वाहतूकदारांचा फसवणूक केली होती
वाहतूकदारांना ऊसतोड कामगार देतो म्हणून त्यांच्याकडून ऍडव्हान्स वसूल करायचा आणि नंतर कामगारांचा पुरवठा करायचा नाही अशा प्रकारे फसवणूक करणारी एक टोळीच कार्यरत असल्याचे यावरून समोर येत आहे आणि पोलिसांनी या टोळीला ताबडतोब जेरबंद करावे अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!