इस्रायलचे खतरनाक यूनिट-8200
सायबर वॉरफेयर युनिट म्हणून करतंय काम
जेरुसलेम
लेबनानमध्ये हिजबुल्लाह फायटर्सना पेजर आणि वॉकी-टॉकी बॉम्बस्फोटात उडवण्याचा सिलसिला सुरु आहे. 100 पेक्षा अधिक फायटर्स जखमी झालेत. 90 जणांना उपचारासाठी इराणला पाठवण्यात आलय. अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर संशयाची सुई इस्रायलच खतरनाक सायबर वॉरफेयर युनिट 8200 वर आहे.
लेबनानमध्ये हल्ले याच युनिटने घडवून आणल्याचा आरोप होतोय. इस्रायल यावर मौन बाळगून आहे. ही योजना बनवण्यासाठी एकवर्षापेक्षा जास्त वेळ लागला, असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. यासाठी अचूक प्लानिंगची गरज होती. यात कथितरित्या युनिट 8200 च नाव घेतलं जातय. या हल्ल्यानंतर हिज्बुल्लाहची झोप उडाली आहे.
यूनिट 8200 हे इस्रायलयच सिक्रेट मिलिट्री युनिट आहे. ते इस्रायली डिफेंस फोर्सचा भाग आहे. हे इस्रायली सैन्याच सर्वात हायटेक युनिट आहे. कारण ते टेक्नोलॉजीने युद्ध लढतात. सायबर डिफेन्ससाठी काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. सर्वात एडवान्स लेव्हलची टेक्निक ते वापरतात. इस्रायलला सायबर हल्ल्यापासून वाचवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आहे. ते टेक्नोलॉजीच्या आधारे गोपनीय माहित मिळवतात.
युनिट 8200 च्या काम करण्याच्या पद्धतीची तुलना अनेकदा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजेंसीबरोबर होते. दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासह सायबर हल्ले करण्याची त्यांची क्षमता आहे. इस्रायलच्या या सीक्रेट युनिटचा भाग बनणं तितकं सोप नाहीय. यात टेक्नोलॉजीशी संबंधित इंटेलिजेंस एक्सपर्ट्सची भरती केली जाते.हे युनिट वेगळ्या पद्धतीने विचार करतं. टेक्नोलॉजी स्पेशलिटी आणि काहीतरी नवीन करण्यावर फोकस करतं. यांच्या यूथ युनिटला हँकिंग, एन्क्रिप्शन आणि पाळत ठेवण्यासारखी कठीणात कठीण काम करण्याची ट्रेनिंग दिली जाते.

