अब्जाधीश महिलेला फाशीची शिक्षा
जगातील सर्वांत मोठे बँक फसवणूक प्रकरण
हो ची मिन्ह
व्हिएतनामच्या ट्रुओंग माय लॅन या अब्जाधीश महिलेला जगातील सर्वांत मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.व्हिएतनामच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. ट्रुओंग माय लॅन यांच्यावर 11 वर्षं देशातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या सायगॉन कमर्शियल बँकेला लुटल्याचा आरोप आहे.लॅन यांनी बँकेकडून 44 अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं होतं. वकील म्हणतात की यापैकी 27 अब्ज डॉलर्स कधीही वसूल होणार नाहीत.
व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरात लेन राहतात. सुरुवातीच्या काळात त्या आईसोबत सौंदर्य उत्पादनं विकायच्या. 1986 मध्ये कम्युनिस्ट पक्षाने सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनंतर त्यांनी जमीन आणि मालमत्ता खरेदी करण्यास सुरुवात केली.1990 च्या दशकात, लॅन मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या मालकीण झाल्या. तर 2011पर्यंत त्या शहरातील एक प्रसिद्ध व्यावसायिक महिला म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या
