अजितदादांना हव्यात ७० जागा
विद्यमान आमदारांना उमेदवारी निश्चित
मुंबई
आगामी विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पार पडली.या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकींच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार आहे. तसंच विद्यमान आमदारांपैकी कुणाचेही तिकीट कापलं जाणार नाही, असं आश्वासन आमदारांना देण्यात आलं आहे.
2019 ला राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले होते, त्यात आणखी 15 जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे. या आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 80 जागांवर दावा करण्याची तयारी दर्शवण्यात आली होती, मात्र आजच्या बैठकीत फक्त 15 जागा वाढवून मागण्याची रणनीती अवलंबण्यात आली आहे.
अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदारांकडून मतदारसंघातून आढावा घेण्यात आला. आजच्या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश असतानाही आमदारांची गैरहजेरी पाहायला मिळाली. वैयक्तिक कारणांमुळे आमदार अनुपस्थित असल्याची माहिती राष्ट्रवाकीकडून देण्यात आली. नवाब मलिकही या बैठकीला उपस्थित नव्हते

