अंकोलाच्या आईचा संशयास्पद मृत्यू
राहत्या घरात सापडल्या रक्त्याच्या थारोळ्यात
पुणे
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील राहत्या घरी सलील याच्या आईचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रभात रोडवर असलेल्या राहत्या घरात त्यांचा मृत्यू झाला आहे. माला अशोक अंकोला आईचे नाव आहे.
त्यांचे वय ७७ होते. माला यांना पूना रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे.प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि अभिनेता सलील याच्या आईचा पुण्यातील प्रभात रस्त्यावरील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. माला अशोक अंकोला यांच्या गळा चिरण्यात आलेला आहे. त्यामुळे हा खून आहे, घातपात आहे किंवा इतर काही याचा तपास पोलीस करत आहेत.
आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरात काम करणारी बाई आली होती. तिने बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या मुलीला फोन केला. त्यानंतर मुलीने वडिलांना याची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांचे पती घरी आले. त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी माला अंकोला या रक्त्याच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची जखम होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र सध्या मृतदेह विश्वविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल

