पेजरनंतर वॉकी-टॉकीमध्ये स्फोट
अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीत झाला स्फोट
बैरुत
मागचे दोन दिवस लेबनानसाठी खूपच धक्कादायक होते. तिथे बॉम्बस्फोटांची मालिका सुरु आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला हिज्बुल्लाह फायटर्सच्या पेजरमध्ये ब्लास्ट झाले. यात 9 जणांचा मृत्यू झाला, शेकडो जखमी झाले होते.बुधवारी अनेक ठिकाणी वॉकी-टॉकी ब्लास्ट झाला. पेजर ब्लास्टमध्ये मृत्यू झालेल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी लोक जमलेले असताना हा वॉकी-टॉकी ब्लास्ट झाला. पेजर ब्लास्टमध्ये हिज्बुल्लाहचा खासदार अली अम्मार यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्ययात्रेसाठी गर्दी जमलेली असताना वॉकी-टॉकीमध्ये ब्लास्ट झाला. लोक खासदाराच्या मुलाला शेवटचा निरोप देत होते. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला. सर्वत्र एकच गडबड, गोंधळ, पळापळ सुरु झाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी इथे-तिथे पळू लागले. या गॅजेट स्ट्राइकमुळे अनेक इमारती, दुकानं आणि गाड्यांमध्ये आग लागली.लेबनानमध्ये जी भिती, दहशतीच वातावरण आहे,
पेजरनंतर वॉकी-टॉकी, लॅपटॉप, फोन, सोलार पॅनल सिस्टिम, फिंगर प्रिंट रीडिंग मशीन आणि रेडियोमध्ये सीरियल ब्लास्ट सुरु आहेत. स्फोटांच्या या दुसऱ्या मालिकेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 450 जखमी झाले आहेत. हिज्बुल्लाह कमांडरच्या हातात डिवाइस असताना बहुतेक स्फोट झाले. हिज्बुल्लाहने पेजरप्रमाणे ही उपकरण पाच महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. पेजर आणि वॉकी टॉकी ब्लास्टमध्ये मिळून आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
लेबनानमधून 95 जणांना उपचारासाठी इराणला पाठवण्यात आलं आहे.

