विकसित भारताची यशोगाथा लिहिणाऱ्यांना फेलोशिप


नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन घोषणा

Advertisement

नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने आपल्या नव्या पब्लिशिंग अँड नॉलेज सेंटरची घोषणा केली आहे. या केंद्राअंतर्गत फाउंडेशनने विकसित भारत फेलोशिपचीही घोषणा केली असून, एकूण 25 जणांना फेलोशिप दिली जाणार आहे.
देशाबद्दल अर्थपूर्ण नॅरेटिव्हसाठी योगदान करणाऱ्या देशातल्या आणि जगभरातल्या उदयोन्मुख तसंच अनुभवी प्रोफेशनल्सचा, तसंच शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांची निवड या फेलोशिपसाठी केली जाणार आहे. त्यासाठी देशाच्या वैविध्यपूर्ण प्रवासाचं विविध प्रकारांमध्ये दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करणं गरजेचं आहे. नॉन-फिक्शन पुस्तकं, लेख, रिसर्च पेपर्स, सामाजिक मूल्यांना वाहिलेलं लहान मुलांसाठीचं साहित्य, बदलांच्या गोष्टी उलगडणारी कॉफी टेबल बुक्स आणि प्रभावांचा अभ्यास मांडणाऱ्या केस-स्टडीज आदी प्रकारे हे डॉक्युमेंटेशन केलं जाऊ शकतं.
ही फेलोशिप त्रिस्तरीय असेल. ब्लूक्राफ्ट असोसिएट फेलोला मासिक 75 हजार रुपये स्टायपेंड दिला जाईल. ब्लूक्राफ्ट सीनिअर फेलोला मासिक सव्वा लाख रुपये, तर ब्लूक्राफ्ट डिस्टिंग्विश्ड फेलोला मासिक दोन लाख रुपयांचा स्टायपेंड दिला जाणार आहे. फेलोशिपचा कालावधी एका वर्षाचा असून, त्या कालावधीत हा स्टायपेंड दिला जाईल.या फेलोशिपसाठी निवड झालेल्या फेलोजना मेंटॉरशिप मिळेल. तसंच, विषयतज्ज्ञ, नामवंत प्रोफेशनल्स, विचारवंत आदींशी चर्चा करण्याची संधी मिळेल. त्यातून त्यांचं संशोधन आणि लेखनासाठी उत्तम रिसोर्सेस मिळतील. यातून पूर्ण झालेलं लेखन ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनअंतर्गत प्रसिद्ध केलं जाऊ शकतं. त्यातून फेलोजना अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल आणि भारताच्या विकासात योगदान करता येईल. इच्छुक उमेदवार एक नोव्हेंबर 2024पर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. यासाठीचे सविस्तर तपशील, मार्गदर्शक सूचना आणि अर्ज www.bluekraft.in/fellowship या वेबसाइटवर उपलब्ध असतील.
ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनचे सीईओ अखिलेश मिश्रा यांनी सांगितलं, की ‘विकसित भारत फेलोशिपचं टायमिंग प्रतीकात्मक आहे. विकास, सर्वसमावेशकता आणि पंतप्रधानांना सर्वांच्या योगदानातून, सहभागातून जी प्रगती अपेक्षित आहे त्यासाठी आमची कटिबद्धता यातून प्रतिबिंबित होते. त्यासाठी आजच्यापेक्षा अधिक चांगलं औचित्य आणखी कोणतं असणार?’
ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने पब्लिशिंग अँड नॉलेज सेंटरची घोषणा केली आहे. अर्थपूर्ण विवेचन आणि उच्च दर्जाच्या पब्लिकेशन्सच्या निर्मितीसाठी हे सेंटर काम करील. आधुनिक आणि उत्क्रांत होत असलेल्या भारताची मूल्यं आणि आकांक्षा, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा दृष्टिकोन यांच्यावर आधारित प्रकाशनांचा यात समावेश असेल. विकासाचे यशस्वी प्रयत्न, परिवर्तनकारी सामाजिक बदलांचं विश्लेषण, तसंच आर्थिक विकास, सामाजिक जागरूकता, अर्थपूर्ण सहभाग या बाबी समजून घेणं याचाही त्यात समावेश असेल. संशोधन आणि वास्तवातले अनुभव यांच्या विश्लेषणातून धोरणकर्त्यांना, प्रॅक्टिशनर्सना आणि नागरिकांना माहिती देणं, प्रेरित करणं आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रगतिशील बदल घडवून आणणं हा केंद्राचा उद्देश आहे.
याविषयी अधिक माहिती www.bluekraft.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!