भारत हॉकीतील एशियन चॅम्पियन
अंतिम सामन्यात चीनवर 1-0 ने मात
नवी दिल्ली
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बलाढ्य भारतीय संघाला चीनवर 1-0 ने मत करत पाचव्यांदा जेतेपद मिळवलं. सलग दुसऱ्यांदा भारताने जेतेपद मिळवलं आहे.
विशेष म्हणजे भारताने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर पार पडलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत जेतेपद मिळवलं आहे. पहिल्या अर्धा तासातील दोन सत्रात एकही गोल झळकावता आला नाही. पहिल्या हाफमध्ये भारताचं वर्चस्व दिसलं पण चीनची डिफेंस भिंत एकदम तगडी होती भारताकडे या सत्रात 84 टक्के बॉल होता. तर चीनकडे ताब्यात फक्त 16 टक्के बॉल होता. तरी भारतीय संघ गोल करण्यात अपयशी ठरला. चीनला एक पेनल्टी, तर भारताला चार पेनल्टी मिळाल्या होत्या. पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात यश आलं नाही.
तिसऱ्या सत्रातही 0-0 अशी स्थिती राहिली. भारतीय संघ गोल करण्यासाठी धडपड करत राहिला पण काही यश मिळालं नाही. पण चौथ्या सत्रात भारताने आपल्या अनुभवाची शिदोरी खोलली आणि पहिला गोल मारला. चौथ्या सत्राच्या सहाव्या मिनिटाला जुगराज सिंगने गोल मारला आणि 1-0 ने आघाडी घेतली.
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन 2011 पासून होत आहे. 2011 साली झालेल्या पहिल्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. तसेच पहिल्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर सलग दोन वेळा पाकिस्तानने जेतेपद मिळवलं. 2016 साली भारताने कमबॅक केलं आणि पाकिस्तानचा हिशेब चुकता केला. 2018 मध्ये भारत-पाकिस्तान हे संघ जॉइन्ट विनर राहिले. 2021 मध्ये दक्षिण कोरियाने जापानला पराभूत करत जेतेपद मिळवलं होतं. तर 2023 साली भारताने मलेशियाला पराभूत जेतेपदावर नाव कोरलं होतं.