शिवाजी विद्यापीठाचे पीएचडी संशोधन केंद्र सुरू


कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला मंजुरी

Advertisement

सातारा प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला शिवाजी विद्यापीठाचे व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखेचे पीएचडी पदवी संशोधनासाठी संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठाने मंजूर केले आहे. रयत शिक्षण संस्थेने संशोधन केंद्रासाठी आवश्यक संशोधन स्वाॅफ्टवेअर, आधुनिक उच्च दर्जाचे संगणक व ग्रंथालयसह सुसज्य संशोधन केंद्र उभारलेले आहे. इन्स्टिट्यटमध्ये एमबीएच्या सर्व प्राध्यापकांनी पीएचडी पदवी संपादन केलेली असून चार प्राध्यापक पीएचडी संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील हे पहिलेच संशोधन केंद्र म्हणून रयतेच्या या इन्स्टिट्यूटला विद्यापीठाने मंजूरी‌ दिलेली आहे.
या शैक्षणिक वर्षापासून या संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पीएचडी संशोधनासाठी प्रवेश मिळणार असून सातारा जिल्ह्यातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदवी संशोधन शिक्षण घेतलेल्या युवकांना सातारा येथील या संशोधन केंद्रामध्ये पीएचडी संशोधन करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बापुसाहेब सावंत यांनी सांगितले.
सातारा येथे संशोधन केंद्र ही सुविधेसाठी संशोधक मागणी करीत होते. संशोधक विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमबीए विभागप्रमुख व संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ सारंग भोला व संचालक डॉ बापूसाहेब सावंत यांनी सातत्याने अनेक वर्षापासुन प्रयत्न केल्यामूळे संशोधन केंद्रास मंजूरी मिळाली त्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ शिवलिंग मेनकूदळे यांनी अभिनंदन केले व संशोधन केंद्रामध्ये उद्योग व व्यवस्थापन क्षेत्रास उपयुक्त व समाजाभिमुख संशोधन करावे असे आवाहन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!