यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये बीबीए, बीसीए केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरु
प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी रविवारी
सातारा
बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दोन वेळा सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. सदरच्या सीईटीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना केंद्रबूत प्रवेश प्रक्रियेतून नोंदणी करून आणि कागदपत्रांची तपासणी करून प्रारूप गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असणारे विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीसाठी पात्र राहणार आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे अंतिम गुणवत्ता यादी रविवारी 22 सप्टेंबर 2024 राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रदर्शित करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार यूजीसी व एआयसीटी नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीबीए बीसीए या पदवी अभ्यासक्रमांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे हे अभ्यासक्रम इंजीनियरिंग पदवीप्रमाणे एआयसीटीइ च्या नियंत्रणाखाली आल्याने महाराष्ट्र शासनाने बारावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सदरच्या अभ्यासक्रमांसाठी सक्तीची केली आहे.
चालू वर्षी बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बीबीए आणि बीसीए या व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे, विद्यार्थ्यांना विविध वसतिगृहांच्या योजनेचे देखील फायदे मिळणार आहेत. त्यामुळे सीईटी दिलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बीबीए आणि बीसीएच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची उपलब्धता करून त्यांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. अशा पद्धतीने केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणारे विद्यार्थीच प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकतात.

यशोदा मध्ये मार्गदर्शन कक्ष:
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये बीबीए आणि बीसीए चे प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मोफत माहिती देण्यासाठी, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. बीबीए आणि बीसीएच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात, कागदपत्रांसंदर्भात, आणि करिअर मार्गदर्शन साठी यशोदा टेक्निकल कॅम्पसला भेट द्यावी असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वतीने करण्यात आले आहे.

