मनातल्या गाण्यांना सातारकरांचा प्रतिसाद
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि सरगम ग्रुपचा उपक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी पतसंस्था आणि सरगम ग्रुप यांच्या विद्यमाने मनातली गाणी या कार्यक्रमात जुनी – नवी ,हिंदी- मराठी गाणी सादर करण्यात आली.
प्रमुख पाहुणे प्राचार्य रमणलाल शहा, शिरीष चिटणीस, मुकुंद फडके ,विकास धुळेकर,सुरेश चिंचकर,अनिल वीर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात सरगम ग्रुपमधील हेमंत शिंदे,संजय गोडसे,सचिन माने,सचिन पाटील ,गजानन नलावडे, खामकर सर सौ मेघा पंडित व श्रीमती संगीता पोतेकर यांनी गाणी गायली.
कार्यक्रमाचे निवेदन सचिन माने सर यांनी केले संगीत संयोजन पिंटू कदम यांनी.केले सातारवासीयांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. सर्व गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी शिरीष चिटणीस यांनी मै काही कवी ना बन जाऊ हे गाणे म्हटले.यात हेमंत शिंदे यांनी गायलेली रूख से जरा नकाब हटाओ मेरे हुजूर, इक हसिन शामको दिल मेरा खो गया,सचिन माने यांनी गायलेली तुमसे मिलने की तमन्ना है, आपके आजानेसे, संजय गोडसे यांनी मैंने पुछा चाँदसे, सतिश पाटील यांनी गायलेल्या कस्मे वादे प्यार वफा, गजानन नलवडेंच्या साथीत कुछ भी नही रहता, गजानन नलवडे यांचे दर्द करारा, लक्ष्मण खामकर यांचे तेरी प्यारी प्यारी सुरत को, संगिता पोतेकर यांचे मोहे रंग दो लाल, लंबी जुदाई, मेघा पंडित यांनी गायलेली दिलबर दिल से प्यारे, जाने जा ढूँढता फिर रहा, त्याचबरोबर त्यांनी गायलेली युगूल गीते भाव खाऊन गेली कार्यक्रमच्या शेवटी हेमंत शिंदे यांनी कधी तू रिमझिम झरणारी बरसात गायले
यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य रमणलाल शहा यांनी कलाकारांना आशीर्वाद दिला शिरीष चिटणीस यांनी सरगम ग्रुपच्या कलाकारांचे कौतुक केले अशी गाणी गाण्यासाठी मोठे परिश्रम घेण्याची गरज असते असे त्यांनी सांगितले मुकुंद फडके यांनी सरगम ग्रुपने निवडलेल्या गाण्यांचे कौतुक केले

