मुलीच्या डोक्यावर सीसीटीव्ही
सुरक्षेसाठी पाकिस्तानी वडिलांचा आगळा निर्णय
कराची
आपल्या मुलीची सुरक्षा हा कोणत्याही आई-वडिलांसाठी काळजीचा विषय असतो पाकिस्तानमधील एका वडिलांनी मुलीच्या अतिकाळजीपोटी वेगळाच निर्णय घेतला आहे या महोदयांनी आपल्या मुलीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी चक्क तिच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे.
वडिलांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अंमलात आणलेला हा पर्याय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक्सवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मुलीची मुलाखत घेताना दिसून येतो. ज्यामध्ये पाहायला मिळते की, तिच्या डोक्यावर एक मोठा सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. मुलाखतीदरम्यान, तिने स्पष्ट केले की तिच्या वडिलांनी तिच्या हालचालिंचा मागोवा घेण्यासाठी आणि तिची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कॅमेरा बसवला होता. जेव्हा तिला विचारले गेले की तिने याला आक्षेप घेतला आहे का, तेव्हा ती म्हणाली की तिने तसे केले नाही. तिने पुढे सांगितले की तिचे वडील तिचे “सुरक्षा रक्षक” म्हणून काम करतात. कॅमेराद्वारे तिच्यावर नजर ठेवतात.
कराचीमध्ये झालेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर मुलीच्या पालकांकडून हा निर्णय घेण्यात आला.तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत असलेल्या तिच्या पालकांनी अशा प्रकारच्या शोकांतिका पुन्हा घडू नयेत म्हणून ही कल्पना अंमलात आणली.

