ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न


वॉशिंग्टन
लास वेगासमधील एका रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
फ्लोरिडाच्या गोल्फ कोर्समध्ये हा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं एफबीआयने सांगितलं आहे.सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सला झुडपांमध्ये रायफलची एक नळी दिसली. त्यानंतर एजंटकडून त्या दिशेनी गोळी झाडण्यात आली.घटनास्थळावर AK -47 सारखी बंदूक आणि बंदुकीचे काही भाग मिळाले आहेत. त्याबरोबरच दोन बॅग आणि एक कॅमेराही घटनास्थळी मिळाला.त्यावेळी ट्रम्प हल्लेखोरापासून 275 ते 455 मीटर अंतरावर होते.13 जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्वेनिया या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता. तेव्हा हल्लेखोराने झाडलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एजंट्सनी फायरिंग केल्यानंतर त्यांनी झुडपासून संशयित बाहेर पडल्याचं पाहिलं. त्यानंतर तो घाईत एका काळ्या रंगाच्या कारमध्ये घुसताना दिसला.एका प्रत्यक्षदर्शीनं नंबर प्लेटसह गाडीचा फोटो घेतला. ही कार नंतर क्लबच्या उत्तर भागातील मार्टिन काऊंटीमध्ये अडवण्यात आली.
या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना ई मेल पाठवत ते सुरक्षित असल्याचं सांगितलं.ट्रम्प म्हणाले की, “माझा वेग कोणी रोखू शकत नाही. मी कधीही पराभव मानणार नाही.”सिक्रेट सर्व्हीसनं ते प्रकरणाचा तपास करत आहेत, असं म्हटलं आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!