सोमवारी मदन मोहन स्पेशल गाण्यांचा कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफरतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर ग्रुप सातारा यांच्यातर्फे मेलडीकिंग संगीतकार मदन मोहन यांच्या गाण्यांवर आधारित संगीताचा कार्यक्रम सोमवार दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन विजय साबळे यांचे असून यावेळी डॉक्टर सुनील पटवर्धन, शिरीष खुटाळे, सचिन शेरकर, मंजुषा पोतनीस, सुषमा बगाडे, वनिता कुंभार, सीमा रजपूत, ममता नरहरी, कविता शिवकुमार,स्मिता शेरकर, मंजिरी दीक्षित,इंद्रायणी कुलकर्णी हे कलाकार गाणी सादर करणार आहेत
कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल कुलकर्णी करणार असून ध्वनी व्यवस्था सचिन व अक्षता शेवडे पाहणार आहेत
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संध्या चौगुले, श्रीरंग जाधव, डॉक्टर श्याम बडवे, सुनील साबळे, विजय साबळे, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस आणि विजय साबळे यांनी केले आहे.

