केबिपी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांकडून सायबर जनजागृती


रयत सेवक बँक ग्राहक मेळाव्यात सायबर सुरक्षेचे धडे
सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये आणि क्विक हिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांनी मास एक्टिव्हिटी आयोजित केली. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये सायबर जनजागृती निर्माण करणे, वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांची माहिती करून देणे तसेच त्या गुन्ह्यांपासून कसे सुरक्षित राहिले पाहिजे याची माहिती करून देणे. यासाठी विद्यार्थ्यांनी दि. रयत को. ऑप सेवक बँक ग्राहक मेळाव्यात रयत सेवकांना व ग्राहकांना सायबर सुरक्षेचे धडे दिले. यामध्ये विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे विविध सायबर गुन्ह्यांची माहिती करून दिली तसेच आजकालच्या ऑनलाईन युगामध्ये होणारे सायबर गुन्हे कसे रोखता येतील याबद्दल माहिती दिली.विशेषता म्हणजे विविध बँकिंग घोटाळे कशाप्रकारे होतात, आपण त्यामध्ये कसे अडकलो जातो, कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत याबद्दल मुलांनी सर्व सेवाकांना जागरूक केले.
क्रिपटोकरन्सीच्या नावाने काही वेळा लूट केली जाते, यामध्ये पैसे गुंतवून पैसे डबल करा अशा अमिषाला बळी पाडून फसवणूक केली जाते. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ओटीपी मागून रक्कम कशी लुटली जाते याची माहिती दिली.ऑनलाईन गेम खेळताना कोणती काळजी घ्यायची तसेच ऑनलाईन गेम द्वारे होणारी फसवणूक याबद्दल उत्तम माहिती दिली.यामध्ये मुलांनी विविध स्लोगन द्वारे लोकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहचवला.
सगळ्यात शेवटी विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांकडून सायबर सुरक्षिततेची शपथ घेतली.यावेळी दि. रयत को.ऑप सेवक बँक सातारा येथील चेअरमन राजेंद्र शिर्के तसेच व्हा. चेअरमान दिलीप डहाळे बँकेचे साईओ भास्कर कणसे, आयटी विभाग प्रमुख विद्या यादव आणि केबिपी मॅनेजमेंट चे कॉम्प्युटर विभाग प्रमुख आर. डी कुंभार तसेच सर्व संचालक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!