२२ सप्टेंबरला दिवस आणि रात्र समान


दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार
मुंबई
दिवस व रात्र यांचा कालावधी सहसा असमान असतो. मात्र, २२ सप्टेंबरला हा कालावधी प्रत्येकी १२ तासांचा राहील. या दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार असल्याचे खगोल तज्ज्ञांनी सांगितले.पृथ्वीवर दर वर्षाला २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. या विशेष तारखांना खगोल शास्त्रात विषुवदिन म्हणतात. इतर वेळी दिवस व रात्र नेहमीच लहान-मोठे असतात. दिवस व रात्रीची असमानता ही पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे निर्माण होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.६ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासापेक्षा मोठा व रात्र १२ तासापेक्षा लहान असते.जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो, तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असतात. पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसात थोडाफार फरक पडू शकत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.
या दोन्ही दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समसमान अंतरावर असतात व प्रकाश वृत्त उत्तर, दक्षिण ध्रुवातून जाते. म्हणून २१ मार्च व २२ सप्टेंबरला दिवस व रात्र समसमान असतात. आकाशात वैषुविक व आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एकातून २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो त्याला वसंत संपात बिंदू म्हणतात तर त्याच्या विरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबरला सूर्य प्रवेश करतो, त्याला शरद संपात बिंदू म्हणतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!