मराठा आरक्षणावर मोठा निर्णय शक्य


हैदराबाद गॅझेट लागू करण्याची महायुती सरकारकडून तयारी

Advertisement

मुंबई
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून सुरु असल्याचं वृत्त आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर काम करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यासाठी २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान विधिमंडळाचं एकदिवसीय अधिवेशन घेतलं जाण्याची दाट शक्यता आहे.
हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासासाठी जुलैमध्ये राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ तेलंगणाला गेलं होतं. हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करुन, आवश्यक कागदपत्रं प्राप्त केली. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रही भूमिका घेतली आहे. तोच मुद्दा निकालात काढण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे.
१८८१ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाज कुणबी होता. तशा नोंदी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या जनगणनेत नोंदी बदलण्यात आल्या. १८८१ च्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला आणि सातारा संस्थांच्या नोंदी तपासून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत, अशी जरांगे पाटलांची मागणी आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!