लाकडापासून बनवली अनोखी बुलेट
९० हजार रुपयात तयार झाली बुलेट
लखनौ
तंत्रज्ञान विकसित होत असल्याने तरुण नवनवीन गोष्टी शोधत आहेत.त्यापैकी एक म्हणजे लाकडी बुलेट.जी दुरून पाहिल्यास मूळ बुलेटसारखी दिसते. मुरादाबाद येथील ही लाकडी बुलेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील जुनैद सैफी नावाच्या तरुणाने ही कमाल केली. त्याने तयार केलेली बुलेट प्रत्येक जण बघतच राहतो. जुनैदने बुलेट तयार करण्यासाठी लाकडाचा वापर केला. यासाठी त्याने तीन महिने काम केले.
बुलेट तयार झाल्यानंतर बिजनौरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले. प्रत्येक जण या बुलेटसमोर उभा राहून सेल्फी घेत आहे. जुनेद हा व्यवसायाने सुतार आहे. नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा विचार जुनैदच्या मनात होता.त्यानंतर त्याने मूळ बुलेटमध्ये बदल करून तिला लाकडाची केली. इतकेच नव्हे तर त्याने लाकडापासून हेल्मेट तयार केले आहे. जुनैदला या बुलेटसाठी ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च झाला आहे

