मतदान जागृती रांगोळी स्पर्धेला प्रतिसाद
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रशासनाचा उपक्रम
कोरेगाव
समाजातील विविध घटकांना समाविष्ट करून घेऊन जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रशासनातर्फे विविध प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी मतदान जनजागृती पथक कार्यरत आहे.पोस्टर, चित्रकला, घोषवाक्य, रांगोळी स्पर्धा प्रभात फेरी तसेच व्याख्याने, प्रतिज्ञा अशा विविध माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती चा संदेश देणाऱ्या रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भगिनींनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .मतदान करू देश वाचवू, मतदान केलेच पाहिजे, मतदान आपला हक्क आणि कर्तव्यही अशा अनेक संदेशातून रांगोळ्यांमधून भगिनींनी मतदानाचा संदेश दिला आहे.समाजातील विविध घटक एकत्र बांधले जावेत आणि त्यातून लोकशाही सुदृढ ,बळकट होण्यासाठी मतदान वाढावे यासाठी पथकाद्वारे विविध प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी दिली .निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजीत नाईक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे, नोडल ऑफिसर धनंजय चोपडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत असून विविध उपक्रम राबवत आहे.विविध घटकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून करण्याचे प्रयत्न कसोशीने चालू आहेत असे देखील म्हणाले.

