मणिपूरमध्ये शांततेसाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे


पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडिलकर यांचे प्रतिपादन

पुणे
​‘वसुदैव कुटुंबकम्’ या मूल्यांच्या आधारे भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल,तर नागरिकांच्या मनामध्ये प्रखर एकात्मतेची ज्योत सतत धगधगत रहायला हवी.मणिपूरमध्ये शांततेसाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत असे प्रतिपादन मणिपूर आणि ईशान्य भारतात ‘शिक्षणच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता’ या ध्येयाने पाच दशके मणिपूर येथे प्रत्यक्ष कार्य केलेले पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी केले
“केशव माधव विश्वस्त निधी” तर्फे ‘धुमसता मणिपूर’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते
जयवंत कोंडविलकर म्हणाले ,पूर्वोत्तर सीमा भागातील वांशिक भेद, फुटीरतावाद,दहशतवादाचे सावट,मादक द्रव्यांचा व्यापार, रोजगाराच्या अल्प संधी,आणि त्यातून बिघडलेला सामाजिक समतोल ,राष्ट्रीयत्वाच्या जाणिवांचा अभाव,वांशिक वेगळेपणाची भावना आणि पाश्चात्यशक्तींचा सांस्कृतिक दबाव अशा विविध समस्यांमुळे भारताचा पूर्वोत्तर प्रदेश विशेषत: सीमा भाग नेहमीच धुमसता असल्याचे दिसून येते.

Advertisement

​२१ व्या शतकातील बदलणारी भू- राजकीय समीकरणे आणि हिंद-पॅसिफिक भागाचे वाढते महत्व या बाबींचा विचार करता पूर्वोत्तर भारत सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरतो. यामुळेचे तेथील समस्यांच्या मुळाशी जाऊन काम करणे गरजेचे आहे. पूर्वोत्तर सीमा भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा विचार खोलवर रुजविणे गरजेचे आहे.आरोग्य,शिक्षण सुविधा, कौशल्य विकास,स्थानिक संस्कृतीचे संवर्धन,युवकांच्या क्षमतांचा विकास यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. स्थानिकांमध्ये आपुलकी निर्माण करून आपलेपणाची भावना निर्माण करता येईल.त्यासाठी सामुदायिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहेत,असेही त्यांनी सांगितले
संगणक तज्ञ डॉ दीपक शिकारपूर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.व्यासपीठावर पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे श्रीपाद दाबक,केशव माधव विश्वस्त निधीचे सचिव अरविंद देशपांडे,विश्वस्त योगेश कुलकर्णी,रवि जावळे ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
​यावेळी जयवंत कोंडविलकर ह्यांनी दृकश्राव्य पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मणिपूर व ईशान्य भारत येथे पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानने जे कार्य गेल्या पाच दशकात केले आहे त्याची माहिती उपस्थितांना दिली.
जयवंत कोंडिलकर यांचे स्वागत केशव माधव विश्वस्त निधीचे विश्वस्त रवि जावळे यांनी तर श्रीपाद दाबक यांचे स्वागत योगेश कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विचाराचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन केले.
​प्रमुख पाहुणे डॉ दीपक शिकारपूर यांनी डिजिटल इंडिया विषयी माहिती दिली.तसेच पूर्वांचल भागातील विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट,कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणक साक्षरते विषयी मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचे सांगितले.
प्रा.श्रुती मेहता यांनी पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान च्या कार्याची आणि भविष्यकालीन नियोजनाची माहिती यावेळी दिली.
“केशव माधव विश्वस्त निधी”चे सचिव अरविंद देशपांडे यांनी केशव माधव संस्थेविषयी प्रास्ताविकात माहिती दिली.सूत्र संचलन दूरदर्शन कलाकार प्रशांत कुलकर्णी यांनी केले.आभार “केशव माधव” चे विश्वस्त योगेश कुलकर्णी यांनी मानले.उपस्थितांच्या प्रश्नांना जयवंत कोंडविलकर यांनी समर्पक उत्तरे दिली.
ह्या कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!