काँग्रेस योग्यवेळी आरक्षण संपवणार
राहुल गांधी यांचे अमेरिकेत मोठे विधान
वॉशिंग्टन
भारतात सध्या आरक्षण हा विषय चर्चेत आहे पण काँग्रेस पक्ष योग्यवेळी आरक्षण संपवणार असल्याचे विधान पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यात जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.विद्यार्थ्यांनी त्यांना भारतीय आरक्षण पद्धतीविषयी प्रश्न विचारले. समान नागरी संहितेविषयी पण सवाल केला. या प्रश्नावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले,देशात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित जाती, आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी संघर्ष करत आहेत. आंदोलने सुरु आहेत.ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्या योग्य वेळ नाही
तुम्ही आर्थिक आकड्यांवर नजर टाकली तर 100 रुपयांपैकी देशातील आदिवासींना 10 पैसे मिळतात. दलितांना 5 रुपये तर ओबीसींना पण इतकीच रक्कम वाट्याला येते. त्यांचा देशातील वाटा कमी आहे. भारतातील प्रत्येक क्षेत्रातील उद्योजकांची यादी काढा. मला त्यात अग्रभागी दलित, आदिवासींचे नाव दाखवा. मला वाटते देशातील 200 जणांमध्ये एखादा ओबीसी असेल आणि ते देशात 50 टक्के आहेत. पण आम्ही आजारपणावर इलाज करत नाही. आरक्षण एकमात्र साधन नाही. इतर पण साधने आहेत.” असे ते म्हणाले.
समान नागरी संहितेविषयी राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा जेव्हा भाजपचा याविषयीचा प्रस्ताव समोर येईल, त्याचवेळी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य असेल, असे ते म्हणाले. याविषयीवर इंडिया आघाडीत मतभेद होते. पण आता अनेक मुद्यांवर सहमती झाल्याचे त्यांनी नमूद केले.

