कविता माझी सखी कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध
नगर वाचनालय सातारा वाचक व्यासपीठ उपक्रम
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा वाचक व्यासपीठ उपक्रमांतर्गत ‘ कविता माझी सखी ‘ हा कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम डॉक्टर श्रीकांत तारे व सौ शिल्पा चिटणीस यांनी सादर केला .
स्वतःच्या उत्तम कविता सोबत त्यांनी कवी नलेश पाटील ,नीलम माणगावे , वैभव जोशी , पद्मा गोळे ,डॉक्टर राजेंद्र माने , दत्ता हलसगीकर , मंगेश पाडगावकर ,भाऊसाहेब पाटणकर , वगैरेंच्या निवडक कविता त्यांनी सादर केल्या . विनोदी ,गंभीर ,सामाजिक , निसर्ग , या विषयावरच्या कविता त्यांनी सादर केल्या ,या अर्थगर्भ कवितांच्या मुळे श्रोते मंत्रमुग्ध तर झालेच पण त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला .

शिल्पा चिटणीस यांनी काही कविता गाऊन सादर केल्या त्यामुळे कार्यक्रमाला वेगळी लज्जत आली .
प्रास्ताविकात लेखक डॉक्टर राजेंद्र माने यांनी कविता विषयकमत मांडताना सर्व रस निर्माण करणारी कविता ही महत्त्वाची असते .गंभीर कवितांना सुद्धा श्रोत्यांनी दाद द्यायला हवी .उत्तम कविता श्रोत्यांनाही समृद्ध करणारी असते असे प्रतिपादन केले .
वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करताना वाचक व्यासपीठांच्या कार्यक्रमांची माहिती दिली गेले पंचवीस वर्ष वाचक व्यासपीठ साहित्य विषय कार्यक्रम सादर करत आहे असे सांगितले .
या कार्यक्रमाला शिरीष चिटणीस , श्रीराम नानल , डॉक्टर संदीप श्रोत्री , डॉक्टर श्याम बडवे ,विश्वजीत जाधव , राजेंद्र घाडगे ,मुकुंद फडके ,श्रीकांत कात्रे ,दिलीप व दिपाली चरेगावकर , गौतम भोसले , एकनाथ तेलतुंबडे वगैरे मान्यवर उपस्थित होते
