लेखक दिलीप कुलकर्णी शनिवारी साताऱ्यात
श्री ब्रम्हेंद्रस्वामी हायस्कूल धावडशी येथे कार्यक्रम
सातारा
प्रख्यात निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी लेखक दिलीप कुलकर्णी शनिवारी सातारा दौऱ्यावर येणार असून त्यांचे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सकाळी अकरा वाजता श्री ब्रम्हेंद्रस्वामी हायस्कूल धावडशी येथे दिलीप कुलकर्णी यांची ग्रंथालय भेट आणि मुलांच्या समोर व्याख्यान होणार आहे.
मुलांची संवाद साधताना येणारा दीपावली महोत्सव पर्यावरण प्रेमी कसा करायचा याचे ते मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचवेळी या शाळेतील प्रत्येक मुलाला हसरी दिवाळी ही पुस्तिका त्यांच्या हस्ते भेट देण्यात येणार आहे.
दिलीप कुलकर्णी हे संध्याकाळी पुस्तक प्रेमी ग्रुपच्या सदस्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत वेगळ्या विकासाचे वाटाडे हा या गप्पांचा विषय असेल हा कार्यक्रम दीपलक्ष्मी सभागृहात होणार आहे
या कार्यक्रमांचा लाभ साताऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी घ्यावा असे आवाहन डॉ संदीप श्रोत्री आणि शिरीष चिटणीस यांनी केले आहे

