साताऱ्यात बुधवारी “कविता माझी सखी” कार्यक्रम
नगरवाचनालय, सातारा यांचा वाचक व्यासपीठ उपक्रम
सातारा
श्री.छ.प्रतापसिंह महाराज ( थो)
नगरवाचनालय, सातारा यांचे वाचक व्यासपीठ उपक्रमातर्फे मराठी कवितांचा, खळखळून हसवणारा सोबत अंतर्मुख करणारा भन्नाट प्रयोग
“कविता माझी सखी” कार्यक्रम पाठक हॉल नगरवाचनालय सातारा येथे बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
सुखदुःखाला प्रवाहित करणारी काळजाला स्पर्श करणारी कविता तसेच मान्यवर कवींच्य कवितांचे सादरीकरण इंदौर-जळगावचे
प्रा.डॉ.श्रीकांत तारे, सातारा-पुण्याच्या शिल्पा चिटणीस सादर करणार आहेत.तरी श्री. छ.प्रतापसिंह
महाराज ( थो) नगरवाचनालय सातारा यांचे वाचक व्यासपीठ
उपक्रमातर्फे “कविता माझी सखी” कार्यक्रमास समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी यावे असे आवाहन श्री.छ.प्रतापसिंह महाराज ( थो) नगर वाचनालय साताराचे अध्यक्ष अजित कुबेर, तसेच कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी केले आहे.
