कळसकर,अंदुरेला जन्मठेप


पुनाळेकर,भावे ,तावडे निर्दोष मुक्त
पुणे
डॉ नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपीना पुणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून संजीव पुनाळेकर,वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली आहे

 


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद यांनी या निकालाचे स्वागत केले असून निर्दोष मुक्त केलेल्या आरोपींच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे
अकरा वर्षांपूर्वी पुण्यात देशाला हादरवून टाकणारी हि घटना घडली होती. तारीख होती 20 ऑगस्ट 2013.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची याच दिवशी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या झाली

Advertisement

 


डॉ. दाभोलकर 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या दोघांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये डॉ. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
११ वर्षानंतर य खटल्याचा निकाल लागला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!