वाचनाची सवय विद्यार्थ्यांना यशाच्या वाटेवर घेऊन जाते:संध्या पवार


जनवाचक चळवळीतर्फे परळी हायस्कूलला पुस्तकांचे वाटप
सातारा
बालवयात लावलेल्या सवयी या शेवटपर्यंत टिकून राहतात .यासाठी चांगले संस्कार घडवावे लागतात.या वयात लावलेली अखंड वाचनाची सवय ही विद्यार्थ्यांना यशाच्या वाटेवर घेऊन जाते असे प्रतिपादन पुस्तक प्रदान कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ संध्या पवार यांनी परळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज परळी येथे जनवाचक चळवळीतर्फे पुस्तक वितरण कार्यक्रमात काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव हे होते सौ संध्या पवार म्हणाल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच अवांतर वाचन नित्य नियमाने केले पाहिजे. यातून आपल्या बुद्धिमत्तेस ज्ञानाची भर पडते .तसेच आपले उच्चार व आचरण चांगले होत असते .
जनवाचक चळवळीचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल यांनी सांगितले की जावळी व सातारा तालुक्यातील अनेक गावात आम्ही पुस्तके वाटत असतो .विद्यार्थ्यांबरोबरच गावातील महिला व मुली यांनीही या वाचन मोहिमेत सहभागी झाले पाहिजे .यातूनच अंधश्रद्धा दूर होऊन विज्ञान विषयक दृष्टी वृद्धिंगत होईल. कार्यक्रमात पुष्पगुच्छ न देता पुस्तके भेट दिली पाहिजेत.आपण ज्या ठिकाणी ग्रंथालय उभे करणार आहोत तेथील पुस्तकांच्या कपाटांना कुलूप न लावता वाचकांना कोणतेही पुस्तक वाचायची सोय ठेवावी .विज्ञान इतिहास अशा विषयांची पुस्तके मनोरंजनांच्या पुस्तकांबरोबर वाचत राहिली पाहिजेत यातून आपली प्रगल्भता वाढते. जनवाचक चळवळ ग्रामीण वाचनालयांना पुस्तके कमी पडू देणार नाही असे उदगार त्यांनी काढले.आजची पुस्तके अंधेरी, मुंबई येथीलआरती नाईक यांनी ही पुस्तके भेट दिली आहेत असे कृतज्ञापूर्वक सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका वैशाली वायदंडे व नारायण पंडित यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ राऊत यांनी केले आभार प्रदर्शन शिक्षिका संगीता वसावे यांनी केले या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जनवाचक चळवळीतर्फे वाचन करण्यासाठी पुस्तके देण्यात आली तसेच या पुस्तकावरील चांगल्या अभिप्रायांना पुरस्कार देण्याची घोषणा श्रीराम नानल यांनी केली या कार्यक्रमास सौ .उज्वला नानल उपसरपंच नंदकुमार धोत्रे व अन्य मान्य व उपस्थित होते या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पत्रकार सोमनाथ राऊत यांनी केले जनवाचक चळवळीच्या या उपक्रमाचे परळीकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

Advertisement

 


जनवाचक चळवळीतर्फे विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करताना सौ. संध्या पवार श्रीराम नांनल सौ उज्वला नानल सोमनाथ राऊत व मान्यवर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!