आमरस’ने पटकावला पहिला क्रमांक
जगातील सर्वोत्कृष्ट मँगो डिशेसची यादी जाहीर
वॉशिंग्टन
आंब्यापासून बनवलेल्या या आमरसने जून 2024 च्या टेस्ट ॲटलसच्या टॉप 10 मँगो डिशमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
भारतामध्ये आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. उन्हाळा सुरू झाला की, लोक आंब्याची आतुरतेने वाट पाहू लागतात. गोड आणि रसाळ आंब्याचा वास इतका मोहक असतो की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते.एवढेच नाही तर पिकलेल्या आंब्याव्यतिरिक्त लोकांना कच्चा आंबाही खायला आवडतो. आंब्यापासून विविध राज्यांमध्ये अनेक पदार्थ बनवले जातात, मात्र यामध्ये सर्वात लोकप्रिय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील ‘आमरस’. आंब्यापासून बनवलेल्या या आमरसने जून 2024 च्या टेस्ट ॲटलसच्या टॉप 10 मँगो डिशमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.आमरस म्हणजे आंब्याचा गर आणि रस यांच्यापासून बनवलेला ज्यूस. आता आमरस व्यतिरिक्त, भारतातील आंब्याची चटणी देखील या यादीत आहे. या यादीत आंब्याची चटणी पाचव्या स्थानावर आहे. थायलंडच्या स्टिकी मँगो राईस या डिशने द्वितीय तर फिलीपिन्सच्या सरबेटने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
