यशोदाच्या विद्यार्थ्यांचे नृत्य स्पर्धेमध्ये यश
यशोदा ज्युनिअर कॉलेज आणि अकॅडमीचे वि द्यार्थी
सातारा
यशोदा ज्युनिअर कॉलेज आणि अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब सेव्हन हिल, सातारा यांच्यामार्फत आयोजित नृत्य व गायन स्पर्धेमध्ये आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. शाहू कलामंदिर येथे रोटरी क्लबने आयोजित केलेल्या कॉलेज नृत्य स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत बाराहून अधिक शाळांनी सहभाग घेतला होता. मुलांचा उत्साह तसेच त्यांची वेशभूषा अत्यंत कौतुकास्पद होती. यशोदा ज्युनिअर कॉलेज आणि अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना विशेष वेशभूषा आणि नृत्य पुरस्कार मिळाला, त्याचप्रमाणे महाविद्यालयीन गटामध्ये विद्यार्थ्यांना नृत्य स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांना त्यांच्या जडणघडणीमध्ये संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ, कलाकौशल्य, नृत्य, गायन अशा आवडीनिवडी जोपासणे आणि त्या वृद्धिंगत करणे महत्त्वाचे
असते. यशोदा इन्स्टिट्यूटच्या सर्वच शाखांमध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच पाठबळ दिले जाते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूटचे संस्थापक- अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कुलसचिव गणेश सुरवसे, यशोदा अकॅडमीचे संचालक श्री अजित घाडगे यांनी विशेष कौतुक केले. यशोदा ज्युनिअर कॉलेजच्या नृत्य शिक्षिका गायत्री उनकुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
