दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे पुस्तकचर्चा


“मोठ्या बँकेची छोटी गोष्ट” पुस्तकावर शनिवारी चर्चा

सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सातारा आयोजित
पुस्तकचर्चा हा कार्यक्रम आयोजित केला आहे ” लेखक विनोद कुलकर्णी-कोषाध्यक्ष,म. सा.प. पुणे यांनी लिहिलेल्या मोठ्या बँकेची छोटी गोष्ट या पुस्तकावर हा चर्चा कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल 759 अ, शनिवार पेठ सातारा येथे शनिवार दि. 17 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, प्रसिद्ध लेखिका व बँकिंग तज्ञ ॲड. सीमा नुलकर, सी.ई.ओ.जनता बँक सातारा अनिल जठार, शिरीष चिटणीस इत्यादी मान्यवर या पुस्तकावर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.
देशांमधील सद्यस्थितीतील राजकारण, अर्थव्यवस्था, बँक धोरण, कर्मचाऱ्यांचे नातेसंबंध यावर प्रकाश टाकणारा असा ग्रंथरूपी दस्तऐवज असणाऱ्या या पुस्तकावरील समग्र चर्चा आयोजित केली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा पत संस्था फेडरेशनचे चेअरमन अविनाश कदम उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

तरी संस्थेतर्फे आयोजित ग्रंथावरील चर्चा कार्यक्रमास सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!